Skip to main content

Posts

Showing posts with the label marathi aarti

विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा / शंकराची आरती

शंकराची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

आरती गणपतीची

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पूर्ती जयदेव जयदेव रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकुमकेशरा हिरेजडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती दर्शनमात्रे मनकामना पूर्ती जयदेव जयदेव लंबोदर पितांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जयदेव जयदेव जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती दर्शनमात्रे मनकामना पूर्ती जयदेव जयदेव